Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जाणून घ्या गणपतीबद्दल 14 गोष्टी...

जाणून घ्या गणपतीबद्दल 14 गोष्टी...
शिव कुटुंबात गणपती हे त्यांचे पुत्र आहे. त्याच्या कुटुंबात प्रत्येक व्यक्ती प्रेमाच्या दोर्‍याने बांधलेला आहे. गणपतीचा कुटुंब सुख आणि समृद्धीने परिपूर्ण आहे. जाणून घ्या गणपतीबद्दल 14 गोष्टी:
1. गणपतीचे आई- वडील: पार्वती आणि शिव.
 
2. गणपतीचा भाऊ: श्रीकार्तिकेय (मोठा भाऊ). तसेच त्यांचे आणखी भाऊ आहे जसे सुकेश, जलंधर, अयप्पा आणि भूमा.
 
3. गणपतीचे 12 प्रमुख नावे: सुमुख, एकदंत, कपिल, गजकर्णक, लंबोदर, विकट, विघ्न-नाश, विनायक, धूम्रकेतु, गणाध्यक्ष, भालचंद्र, गजानन.
 
4. गणपतीची बहीण: अशोक सुंदरी. तसेच महादेवांच्या आणखी कन्याही होत्या ज्यांना नागकन्या मानले आहेत- जया, विषहर, शामिलबारी, देव आणि दोतलि. अशोक सुंदरी ही महादेव आणि पार्वती यांची कन्या असल्यामुळे हिला गणपतीची बहीण म्हटले आहे. हिचा विवाह राजा नहुष यांच्याशी झाला होता.

5. गणपतीच्या बायका: गणपतीच्या 5 बायका आहेत: ऋद्धी, सिद्धी, तुष्टी, पुष्टी आणि श्री.
 
6. गणपतीचे पुत्र: पुत्र लाभ आणि शुभ व नातवंडे आमोद आणि प्रमोद.
 
7. अधिपती: जल तत्त्वाचे अधिपती.
webdunia
8. प्रिय पुष्प: लाल रंगाचे फूल.
 
9. प्रिय वस्तू: दूर्वा, शमी-पत्रक.

10. प्रमुख अस्त्र: पाश आणि अंकुश. 
 
11. गणपती वाहन: सिंह, मयूर आणि मूषक. सतयुगात सिंह, त्रेतायुगात मयूर, द्वापर युगात मूषक आणि कलियुगात अश्व आहे.
 
12. गणपतीचा जप मंत्र: ॐ गं गणपतये नम:
webdunia
13. प्रिय मिष्टान्न: बेसनाचे लाडू आणि मोदक.
 
14. गणपतीची प्रार्थना करण्यासाठी: गणेश स्तुती, गणेश चालीसा, गणपतीची आरती, श्रीगणेश सहस्रनामावली इत्यादी.

Share this Story:

Follow Webdunia marathi