Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रेण्ड रेडिमेड गुढीचा

ट्रेण्ड रेडिमेड गुढीचा
गुढी म्हणजे आनंद, विजय आणि स्वागताचे प्रतीक. उंच बांबूपासून गुढी तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंबाचा, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे (तांब्या) बसवला जातो. नंतर गुढी पाटावर उभी केली जाते. मात्र आताच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळही मिळणे कठीण झाले आहे. याला पर्याय म्हणूनच रेडिमेड गुढीचा नवा ट्रेण्ड निर्माण झाला.


आता गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबई, ठाणे येथील बाजारपेठांमध्ये विविध आकाराच्या आकर्षक गुढय़ा ग्राहकांना भुरळ पाडत आहेत. साधारण ६५ ते २३0 रुपयांपर्यंत विविध आकाराच्या गुढय़ा बाजारात उपलब्ध आहेत. यंदा ५ ते १0 रुपयांनी गुढय़ांच्या किमतीत वाढ झाली असल्याचे दुकानदार प्रतीक विध्वंस यांनी सांगितले. तर गेल्या चार-पाच वर्षांपासून रेडिमेड गुढीचा ट्रेण्ड बाजारात आला असून अलीकडे या छोट्या गुढय़ांना ग्राहकांची जास्त मागणी असल्याचेही ते म्हणाले. पाट आणि त्यावर असलेले नक्षीदार कापड, नारळ, तांब्या, आंब्याची पानं, गुढीभोवती असलेले कापड, हार इत्यादी सर्व साहित्याचा समावेश रेडिमेड गुढीमध्येही पाहावयास मिळतो. त्यामुळे या सगळ्या साहित्याची जमवाजमव करण्यापेक्षा या रेडिमेड गुढय़ा घेण्याकडेच लोकांचा अधिक कल वाढल्याचे दिसून येते. सुंदर नक्षीकाम, चमकदार कापड व आकर्षक सजावटीमुळे या मनमोहक रेडिमेड गुढय़ा खरेदी करण्याचा मोह नागरिकांना होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे.


मयुरी चव्हाण

Share this Story:

Follow Webdunia marathi