चैत्र मासात शुक्ल पक्षातील तृतीयेला गौरीच्या (पार्वती वा अन्नपूर्णादेवी) मूर्तीची स्थापना केली जाते. या दिवशी गौरी ही माहेरी येते अशी समजूत आहे. विषम संख्यांच्या पायर्यांवर देवीची आरास मांडण्यात येते. गौरीचा पाळणा बसवून त्याभोवती सोयीप्रमाणे विविध फळं, फराळ, गोड पदार्थ आणि खिरापतीचा (सुके खोबरे आणि साखर) नैवेघ दाखवला जातो. हौसेप्रमाणे देवीच्याभोवती सुवासिक फुलांची किंवा आर्कषक झाडांची कुंडी मांडली जाते.