Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gudi Padwa 2021 गुढीपाडवा मुहूर्त, पूजा विधी, मंत्र

Gudi Padwa 2021 गुढीपाडवा मुहूर्त, पूजा विधी, मंत्र
, बुधवार, 7 एप्रिल 2021 (11:34 IST)
चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा सण साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस असून वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. 
 
गुढीपाडवा मुहूर्त
 
प्रतिपदा तिथी प्रारंभ
12 एप्रिल 2021 सोमवार, 08:02:25 पासून
प्रतिपदा तिथी समाप्ती 
13 एप्रिल 2021 मंगळवार, 10:18:32 पर्यंत
 
चैत्र शुक्ल प्रतिपदा : सकाळी 10 वाजून 16 मिनिटे
प्लवनाम संवत्सर शालिवाहन शके 1943 प्रारंभ
सूर्योदय: सकाळी 6 वाजून 24 मिनिटे
सूर्यास्त: सायं. 6 वाजून 54 मिनिटे
 
1. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षात ज्यादिवशी सूर्योदयावेळी प्रतिपदा असेल त्या दिवसापासून नव संवत्सर आरंभ होतं.
2. जर प्रतिपदा दोन दिवस सूर्योदयावेळी पडत असेल तर पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा करतात.
3. जर सूर्योदयावेळी कोणत्याही दिवशी प्रतिपदा नसल्यास तर नववर्ष त्या दिवशी साजरा करतात ज्यादिवशी प्रतिपदा आरंभ व अंत होत असेल.
 
गुढीपाडवा पूजन-मंत्र
गुढीपाडवा या ‍दिवशी पूजेसाठी निम्न मंत्र जपावे.
 
प्रातः व्रत संकल्प
ॐ विष्णुः विष्णुः विष्णुः, अद्य ब्रह्मणो वयसः परार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे जम्बूद्वीपे भारतवर्षे अमुकनामसंवत्सरे चैत्रशुक्ल प्रतिपदि अमुकवासरे अमुकगोत्रः अमुकनामाऽहं प्रारभमाणस्य नववर्षस्यास्य प्रथमदिवसे विश्वसृजः श्रीब्रह्मणः प्रसादाय व्रतं करिष्ये।
 
शोडषोपचार पूजा संकल्प
ॐ विष्णुः विष्णुः विष्णुः, अद्य ब्रह्मणो वयसः परार्धे श्रीश्वेतवाराहकल्पे जम्बूद्वीपे भारतवर्षे अमुकनामसंवत्सरे चैत्रशुक्ल प्रतिपदि अमुकवासरे अमुकगोत्रः अमुकनामाऽहं प्रारभमाणस्य नववर्षस्यास्य प्रथमदिवसे विश्वसृजो भगवतः श्रीब्रह्मणः षोडशोपचारैः पूजनं करिष्ये।
 
पूजा झाल्यावर व्रत करत असलेल्यांनी या मंत्राचा जप करावा
ॐ चतुर्भिर्वदनैः वेदान् चतुरो भावयन् शुभान्।
ब्रह्मा मे जगतां स्रष्टा हृदये शाश्वतं वसेत्।।
 
गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत
गुढीपाडवाच्या अदल्यादिवशी घराची सफाई करावी.
शास्त्रांनुसार या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करावे.
सूर्योदयानंतर लगेच गुढी उभारावी. यात उशिर होता कामा नये.
या दिवशी गुढीसमोर तसंच दारासमोर रांगोळी काढावी.
ताज्या फुलांनी घरात सजावट करावी.
नवीन वस्त्र परिधान करावे.
या दिवशी नातेवाईक एकमेकांना शुभेच्छा देतात.
या दिवशी पंचाग ऐकण्याची देखील परंपरा आहे.
पारंपरिक रुपात या दिवसाची सुरुवात कडुलिंबाची पाने प्रसाद म्हणून खाऊन केली जाते.
या दिवशी कडुलिंबाच्या पानांची चिंच घालून चटणी देखील तयार केली जाते. याने रक्त शुद्धी होते शरीराची रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते.
गुढीपाडव्याला श्रीखंड-पुरीचा नैवेद्य दाखवला जातो.
 
गुढीपाडवा पूजाविधी
ज्या जागी गुढी उभारायची असेल ती जागा स्वच्छ करावी.
तेथे रांगोळी काढून स्वस्तिक चिन्ह काढावं.
त्यावर हळद-कुंकु वाहावं.
गुढीसाठी उंच बांबू स्वच्छ करुन त्याच्या टोकाला केशरी रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळावी.
काठीला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या बसवावा.
तांब्या पितळं, चांदी, कास्य याचा असावा. फुलपात्र देखील वापरता येतं.
गुढीचा बांबू पाटावर उभा करण्यापूर्वी त्यावर तांदळाची रास करावी.
तयार केलेली गुढी उंच जागेवर लावावी.
गुढीची काठी बांधून त्यावर गंध, फुले, अक्षता वाहाव्या.
गुढीची पूजा करावी.
निरांजन लावून उदबत्ती दाखवावी.
गोडाचा नैवेद्य दाखवावा.
दुपारी संपूर्ण जेवणाच्या ताटाचा नैवेद्य दाखवावा.
संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले व अक्षता वाहून गुढी उतरवण्याची प्रथा असते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणपतीचे 5 चमत्कारी मंत्र