Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Gudi Padwa 2026 Wishes in Marathi गुढी पाडवा शुभेच्छा संदेश

Gudi Padwa Wishes in Marathi
नव्या वर्षाची नवी पहाट, 
सुखाचा येईल नवा घाट... 
आनंदाची गुढी उभारूया, 
प्रगतीचा मार्ग धरूया
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
चैत्राची सोनेरी पहाट, 
नववर्षाची नवी लाट... 
आपल्या आयुष्यात सुखाचा सुगंध दरवळू दे
हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!
 
उंच उभारून आनंदाची गुढी, 
आयुष्यात येवो सुख-समृद्धीची गोडी
नववर्षाच्या मंगलमयी शुभेच्छा!
 
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, 
सोनेरी किरणांचा सोनेरी उत्सव... 
गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यात येवो सुवर्णकाळ!
 
जुने ते मागे सारा, 
नव्या स्वप्नांना द्या उभारी... 
गुढीपाडव्याच्या या शुभ दिनी, 
सुख येवो तुमच्या घर दारी
शुभ गुढीपाडवा!
 
दुःख विसरा, आनंद स्वीकारा... 
नववर्षाचा हा सण, उत्साहाने साजरा करा
गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
 
यशस्वी व्हा, प्रगती करा आणि सदैव आनंदी राहा... 
यंदाचा पाडवा तुमच्यासाठी यशाची नवीन शिखरे घेऊन येवो
हार्दिक शुभेच्छा!
 
नक्षीदार काठी, त्यावर रेशमी वस्त्र... 
साखरेची गाठी आणि कडुनिंबाचे शास्त्र
गुढीपाडव्याचा सण म्हणजे विजयाचे अस्त्र!
 
येवो सुख-शांती तुमच्या अंगणी, 
सदा हसत राहो तुमची लेखणी... 
नववर्षाच्या या मंगल समयी, 
शुभेच्छांचे दीप उजळू दे मनी.
 
चंदनाच्या काठीवर शोभे रेशमी वस्त्र, 
आनंदाची गुढी उभारूया हेच विजयाचे शस्त्र
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
 
संकल्प असावा नवा, ध्यास असावा प्रगतीचा... 
गुढीपाडव्याचा हा सण असावा, फक्त आणि फक्त आनंदाचा!
 
उमलताना नवीन वर्षाची ही पहाट, 
स्वप्नांच्या नवनवीन वाटा धुंडाळूया... 
गुढीपाडव्याच्या आपणास आणि आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!
 
वसंत ऋतूचा सुगंध, कोकिळेचा मंजुळ स्वर... 
नववर्षाच्या स्वागतासाठी नटलाय अवघा चराचर
शुभ गुढीपाडवा!
 
तुमचे सर्व संकल्प पूर्ण होवोत, 
घराघरात सुख-समृद्धी नांदो... 
हीच सदिच्छा! 
हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gudi Padwa 2026 Essay in Marathi गुढीपाडवा निबंध मराठी