Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुढीपाडवा : आरती गुढीची

गुढीपाडवा : आरती गुढीची
, मंगळवार, 13 एप्रिल 2021 (11:22 IST)
गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ही तिथी,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
 
विश्व निर्मिती ब्रह्म करीतो, ब्रमहपुराणी असे,
अयोद्धेसी वनवासाहुनी राम पुन्हा परतसे,
गुढ्या-तोरणे रांगोळ्यांनी स्वागत ते करीती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
 
माधव तसे मधुमास ही वेदातील ही नावे,
पंचांगाचे पूजन सर्वही करती मनोभावे,
सरस्वतीस गंध अन पाटी ही पुजिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
 
साखरमाळ कडुलिंबाची पाने फुलमाळा,
गडु चांदीचा रेशमी वस्त्र कुंकू ,केशर , टिळा,
आदराने ब्रह्मध्वज या गुढीस संबोघिती,
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
 
पिशाच्च जाई दूर पळुनी कडुलिंबाचा टाळा,
कडू रसाचे सेवन करूया गूळ जिरे घाला,
गुढीपाडवा सण हा पहिला वर्षाचा करीती
आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णू किती
 
गुढी उभारू चैत्र मासि प्रतिपदा ही तिथी
आरती करुनि वसंत ऋतुचा महिमा वर्णू किती
 
-सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Durga Chalisa : नमो नमो दुर्गे सुख करनी चैत्र नवरात्रीत श्री दुर्गा चालीसा पाठ करा