Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 22 March 2025
webdunia

गुढीपाडवाचे मुहूर्त आणि पौराणिक संदर्भ

गुढीपाडवाचे मुहूर्त आणि पौराणिक संदर्भ
चैत्र शु.प्रतिपदेला हिंदु नविन वर्षाचा प्रारंभ होतो.देशभरात हा सण वेगवेगळ्या नावांनी ओळखला जात असुन महाराष्ट्रात गुढीपाडवा या नावाने विख्यात आहे. वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा पुर्ण दिवस एक मुहूर्त मानला जातो
 
मुहूर्त - प्रतिपदा तिथि प्रारम्भ = १७/मार्च/२०१८ ला १८:४१ वाजेपासून व प्रतिपदा तिथि समाप्त = १८/मार्च/२०१८ ला १८:३१ ला होणार आहे. या वेळेत गुढीची पुजा करावी...पूर्ण दिवस शुभ असल्याने कोणतेही शुभारंभ आज करावे..आजच्या दिवशी राहु काळचा बाध नसतो.
 
पौराणिक संदर्भ - पौराणिक द्रूष्ट्या अनेक बाबतीत गुढीपाडव्याचे महत्व आहे. ह्या दिवशी ब्रह्मदेवाने स्रुष्टी निर्माण केली. म्हणून हा स्रुष्टीचा पहीला दिवस मानला जातो.
 
शालीवाहन नावाच्या एका कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार करून त्यावर पाणी शिंपडले त्यांच्यात प्राणांचा संचार केला व प्रभावी शत्रूला पराभूत केले. 
 
त्यांच्या विजय प्रित्यर्थ शालीवाहन शक सुरु झाले. ते याच दिवशी....या कथेतील तात्पर्य असे की, त्या काळात संपूर्ण हिंदु समाज चेतनाहिन झाला होता. गुलामीची इतकी सवय झाली होती की तो प्रतिकार शक्तीच घालून बसला होता.समाजातील क्षात्रतेज संपले होते. शालीवाहनाने आपल्या शक्तीचा विसर पडलेल्या समाजात आत्मविश्वास जागवला त्याला शक्तीशाली बनविले.
 
तसेच याच दिवशी बालीचा पराभव करुन रामाने दक्षिणे कडील प्रजेला सुखी केले. त्या निमित्त सर्वांनी ध्वज उभारुन आनंदोत्सव साजरा केला.
 
पूजा साहीत्य - वेळुची काठी, उटणं, सुगंधीत तेल, हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ, साखरेचे कडे व माळ, तांब्याचा कलश, सुतळी, पाट, रांगोळी,दाराला लाल फुलांसहीत अंब्याचे तोरण, निरांजन, अगरबत्ती, नागलीचे पाने, फळे, सुपारी, 
तांब्या ताम्हण पळी पेला, हार, सुटी फुले
 
कडुनिंबाचा प्रसाद- कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे, हिंग, गुळ
 
विधी- पहाटे सुर्योदयापुर्वी उठावे. अंगाला उटणे व सुगंधीत तेल लावून अभ्यंग स्नान करावे. दरवाजाला तोरण बांधावे.
 
एका वेळुच्या काठीला तेल लावून स्नान घालावे. नंतर एका टोकाला केशरी वस्त्र बांधावे. कलशाला पाच गंधाचे पट्टे ओढावे व गजरा बांधावा. नंतर कलश उपडा ठेवावा. काठीला अंब्याचा डगळा, निंबाचा पाला बांधावा. चाफ्याच्या फुलांची माळ घालावी. गुढीची ओं ब्रह्मध्वजाय नमः ।। म्हणून पुजा करावी. कडुनिंबाचा प्रसाद दाखवावा व घरातुन उजव्या बाजुला दिसेल अशी उभारावी.
 
नंतर प्रार्थना करावी की, ब्रह्मध्वजास माझा नमस्कार असो. या वर्षामध्ये माझ्या घरात नित्य मंगल कल्याण होऊ दे. पंचांगाचे पूज न करावे.
 
महत्त्व - ह्याच दिवशी वसंत रुतु सुरु होतो. सर्व रुतुत वसंत मीच आहे अस भगवान गीतेत सांगतात. वसंत निसर्गाला नव बहार देतो. वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी नव जीवन सुरु करण्याच्या द्रुष्टीने मन सकारात्मक झालेले असते. 
 
या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने रज तम गुण एक लक्षांश एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सतोगुण वाढलेले असतात. गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त भुलोका कडे पाठविल्या जातात.
दुरदर्शनच्या अंटीन्या प्रमाणे गुढी काम करते. तांब प्रजापती लहरींना आकर्षित करतो व खाली मुख असल्याने घराकडे त्या लहरी पाठवतो. प्रजापती लहरींनी संस्कारीत तांब्यातुन वर्षभर पाणी प्याल्याने आरोग्य लाभते.
कडुनिंब जंतुनाशक असल्याने गुढीवर लावल्याने घरात रोगजंतुना अटकाव होतो. तसेच कडुनिंब खाल्याने आरोग्य मिळते. 
 
कडुनिंब हा सर्वद्रुष्ट्या आरोग्यदायी आहे. निंब कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक आहे. निंब सेवनाने पाचनक्रीया सुधारते. वसंतात कफाचा प्रकोप असतो त्यावर निंब उपाय ठरतो. खोकला बरा होतो.
 
वसंत निसर्गाला नवजीवन देणारा आहे. तसा वसंताच्या वातावरणात निंब सेवन आरोग्य देऊन मनुष्याला नवजीवन देते.
 
उपक्रम- १.सर्वांना हिंदु नव वर्षाच्या शुभेच्छा द्याव्या.२. निसर्गाच्या सान्निध्यात राहुन निसर्गाचे निरीक्षण करत आनंद घ्यावा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गजानन बावन्नी