Publish Date: Thu, 01 Dec 2022 (08:20 IST)
Updated Date: Thu, 01 Dec 2022 (08:21 IST)
गुजरातमध्ये विधानसभेच्या 89 जागांवर आज मतदान सुरु झाले आहे. 19 जिल्ह्यात हे मतदान होत असून त्यासाठी एकूण 788 उमेदवार रिंगणात आहे. मंगळवारी या प्रचाराची सांगता झाली. दुसऱ्या टप्प्याचं मतदान 5 डिसेंबरला आहे.
सकाळी 8 ते 5 या वेळात मतदान होणार आहे. त्यासाठी 14,382 मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आल्याचं गुजरातच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं.
गुजरातमध्ये एकूण 4.91 कोटी मतदार आहे. त्यापैकी 2.4 कोटी लोक आज मतदान करतील. त्यात 18-19 वयोगटातले 5.74 लाख मतदार आहेत तर 99 वर्षापेक्षा अधिक वयाचे 4945 मतदार आहेत.