साहित्य : 3-4 कप उकळलेले भुट्ट्याचे दाणे, 3 बटाटे, कांदे उकळलेले, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरं, मीठ, तिखट, 2 चमचे लिंबाचा रस, धने पूड, हिंग, 1/2 बारीक शेव, सजावटीसाठी नारळाचा भुरा.
कृती : भुट्ट्याचे उकळलेले दाणे व बटाटेचे काप करून ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात हिंग व जिरं घालून फोडणी द्यावी, नंतर चिरलेले कांदे, टोमॅटो घालून चांगले परतून त्यात बटाटे, भुट्टाचे दाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, लिंबाचा रस टाकावा. 5 मिनिट शिजवावे. सर्व्ह करताना वरून शेव व नारळाचा भुरा टाकावा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा