साहित्य : 1 पॅकेट इन्सस्टेंट ढोकळा मिक्स, 1 कप दही, 250 मिली लीटर दूध, 2 चमचे गजराचा कीस, आलं व हिरव्या मिरच्या बारीक कापलेल्या.
कृती : सर्वप्रथम बाउलमध्ये ढोकळा मिक्स पावडर, दही, आलं व हिरव्या मिरच्या टाकाव्या नंतर दूध घालून त्या मिश्रणाला एकजीव करावे. इडलीपात्रात चारी बाजूने तेलाचा हात लावून त्यात हे मिश्रण टाकावे. वरून प्रत्येक इडलीवर गाजराचा कीस घालून इडली तयार करावी. कोथिंबीर-पुदिन्याच्या चटणी व सॉस सोबत सर्व्ह करावे. बगेर तेलाची ढोकळा इडली तयार आहे.