स्टीम बेक पालक रोल्स

साहित्य : कप बारीक कापलेला पालक, 4 मोठे चमचे बेसन, 1 मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट, 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 मोठा चमचा तेल, 1 लहान चमचा मोहरी, 1/2 लहान चमचा तिखट, 4-5 हिरव्या मिरच्या, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम बेसनाला कढईत तेल न टाकता भाजून घ्यावे. पालक, बेसन, आलं-लसूण पेस्ट, मीठ व तिखट घालून मिक्स करून घ्यावे. या मिश्रणाचे लहान लहान रोल करावे. कुकराला शिटी न लावता सर्व रोल स्टीम करून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर कढईत तेल गरम करून त्यात मोहरीची फोडणी देऊन त्यात काप केलेले कांदे परतून घ्यावे. हिरव्या मिरच्या व टोमॅटो घालून 2 मिनिट चांगले शिजवावे. नंतर त्यात रोल घालून सर्व्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख ओल्या काजूची उसळ