Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%9f %e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%9a 109021700024_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंबट लोणच

कैरी
ND
साहित्य : एक किलो कैरी, 100 ग्रॅम मीठ, दोन चमचे हळद, सहा चमचे तिखट, दोन चमचे वाटलेली मोहरीची डाळ, पाच चमचे मेथीदाणे, पाच चमचा शोप, चवीपुरता हिंग, 250 ग्रॅम सरसोचे तेल.

कृती : कैरीच्या फोडी करून घ्या. कैरीचे देठ व आतील मगज काढून घ्या. याला 20 ग्रॅम मीठ व हळद लावून 2 तास भांड्यात ठेवून पाणी काढून घ्यावे. मग त्या फोडींना 3-4 तास उन्हात वाळवून घ्यावे. एखाद्या भांड्यात तिखट, सरसो व उरलेले मीठ टाकावे. एका भांड्यात 125 ग्रॅम तेल कडक गरम करून त्यात मेथी-शोप वाटून टाकावे हिंग टाकावा. त्याला हवेशिर ठेवून ते चमच्याने हलवत रहा. सर्व मिश्रण एक जीव झाल्यावर कापलेल्या कैरीच्या फोडी मिसळा. उरलेले तेल त्यात टकून तीन ते चार दिवस उन्हात ठेवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi