साहित्य : 2 मध्यम आकाराचे सफरचंद, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 तुकडा दालचिनीचा, 2 लवंगा, 1 तेजपान, 1 वेलची, 1/2 चमचा जिरं, 2 मोठे चमचे तेल, 2 कप नारळाचे दूध, 1 चमचा कॉनफ्लावर, 1 हिरवी मिरची, मीठ चवीनुसार.
कृती : सर्वप्रथम सफरचंदाला सोलून त्याचे तुकडे करून घ्यावे. नारळाच्या दुधात कॉर्नफ्लॉवर मिसळून त्याचा घोळ तयार करावा. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात दालचिनी, लवंगा, तेजपान, वेलची व जिऱ्याची फोडणी घालावी. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतावा व हिरवी मिरची, नारळाचे दूध व कापलेले सफरचंदाचे तुकडे घालून 5 मिनिट शिजवावे. गरम गरम एपल स्ट्यू तयार आहे. याला भात किंवा पुलाव सोबत खायला पाहिजे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा