साहित्य : 6 ब्रेडचे स्लाईस, पाऊण वाटी साखर, दीड वाटी दूध, 1 वाटी साखर, 3 चमचे नेस कॉफी, 2 चमचे लोणी, अर्धा चमचा दालचिनीपूड.
सॉससाठी : 3 अंड्यातील पिवळे बलक, 4 चमच साखर, दीड वाटी साय, दीड वाटी नेस कॉफी, चवीसाठी मीठ.
कृती : ब्रेड स्लाईस लोणी लावून घ्या. स्लाईसचे लहान तुकडे करून पुडिंगच्या बाऊलमध्ये लावून घ्या. त्यावर साखर घाला. अंडी फेसलेले घाला. परत थोडी साखर घाला, दूधात कॉफी घालून ढवळून त्यावर ओता. वरून दालचिनी पूड घाला व अर्धा तास पुडिंग बेक करा. गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा व नंतर कॉफी व साय एकत्र करून त्यात साखर घालून ढवळून थंड झालेल्या पुडिंगवर घाला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा