साहित्य : तांदळाचा रवा, गूळ किंवा साखर, नारळ, तूप, वेलदोडे.
कृती : तांदळाचा रवा तुपावर चांगला तांबूस होईपर्यंत भाजावा. रवाच्या दुप्पट पाणी घेऊन, त्यात रव्यापेक्षा थोडा जास्त गूळ किंवा साखर घालावी. चवीला थोडेसे मीठ घालावे व उकळी आल्यावर भाजलेला रवा त्यात घालून चांगला शिजवावा. वेलदोड्यांची पूड घालावी. चांगला शिजून घट्ट झाल्यावर परातीला किंवा ताटाला तुपाचा हात लावून शिजलेला रवा ओतावा व वर ओले खोबरे घालून थापावा व वड्या कापाव्यात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा