Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%ad%e0%a4%9c%e0%a5%80 108101000014_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गिलकीची भजी

गिलकीची भजी
WD
सामग्री :
2 बारीक गिलकी, 1 मोठी वाटी बेसन, एक छोटा चमचा तांदळाचे पीठ, बारीक कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या, एक चमचा शौफ, चिमूटभर हिंग, 1 चमचा लाल मिरचीचे पूड, कोथिंबीर, गोडेतेल व चवीपुरते मीठ.

पद्धती :
सर्वप्रथम गिलकी पाण्याने स्वच्छ करून त्याचे गोल-गोल चकत्या कापून तयार ठेवा. त्यानंतर एका पातेल्यात बेसन व तांदळाचे पीठ घेऊन त्यात बारीक केलेली हिरव्या मिरच्या, लाल मिरचीचे पूड, हिंग, मीठ, शौफ व कोथिंबीर टाकून पाण्यात भिजवून घ्या. त्यात मोहन म्हणून एक चमचा तेल टाकावे.

एका मोठी कढईत तेल तापवण्यासाठी ठेवा तेल चांगले गरम झाल्यानंतर गिलकीच्या एक- एक चकत्या तयार केलेल्या बेसनामध्ये बुडवून तेलात टाका. हिरव्या मिरचीच्या चटणीसोबत गरमा- गरम भजे सर्व करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi