साहित्य : 500 ग्रॅम दही, 50 ग्रॅम बेसन, 1 पिकलेलं केळ, 1/2 संत्र, 2-3 हिरव्या मिरच्या, आलंच दीड इंच लांब तुकडा, 2 लिंबाचा रस, 2 काड्या गोड लिंब, 2 चमचे मीठ, 2-3 अख्ख्या मिरच्या, 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मेथी, 3-4 लवंगा, 3 तमालपत्रे, 3 तुकडे दालचिनी, 1/4 चमचा हिंग, 4 चमचे साखर, 1 चमचा साजुक तूप.
कृती : सर्वप्रथम केळीचे तुकडे करून घ्यावे. संत्र्याला सोलून त्याच्या फोडी वेगळ्या करून घ्याव्या. हिरव्या मिरच्या, आलं यांना बारीक कापून घ्यावे. दह्यात बेसन मिसळावे. तूप गरम करून त्यात आलं, हिरव्या मिरच्या, मोहरी, जिरं, गोड लिंब, लवंगा, लाल मिरच्या, दालचिनी वे तमालपत्राची फोडणी देऊन त्यात हिंग व मेथी टाकावी. 5 कप पाण्यात साखर, मीठ टाकून झाकन ठेवावे. एक उकळी आल्यावर त्यात दही-बेसनाचा घोळ टाकून 15 मिनिट उकळावे. खाली उतरवून लिंबाचा रस, केला व संत्री मिसळून एकजीव करावे.