साहित्य : 2 कप ताक, 2 चमचे बेसन, गुडाचा खडा, मीठ.
फोडणीचे साहित्य : कढी पत्ता, हिरव्या मिरच्या, जिरं, लवंगा, एक मोठा तुकडा दालचिनीचा, हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा मेथी दाणा, आलं, हिंग.
कृती : सर्वप्रथम ताकात बेसन घालून घोळ तयार करून घ्यावा, त्यात गुड व मीठ घालून उकळत ठेवावे, चांगल्या प्रकारे उकळल्यानंतर त्यात फोडणी घालावी. व एक उकळली आल्यानंतर गॅस बंद करावा. ही कढी फारच रूचकर लागते.