साहित्य : 6 बटाटे, 1/4 चमचा तेल, 2 कप पाणी, 3/4 चमचा मोहरी, चिमूटभर हिंग, 2 लाल मिरच्या, 1/2 चमचा हळद पूड, दीड चमचा तिखट, 1/2 चमचे धणे-जिरे पूड, 3 छोटे चमचे मीठ, 3 कोकम, 20 ग्रॅम गूळ किसलेला.
कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये बटाटे शिजवून घेऊन त्याचे तुकडे करा. कढईत तेल गरम करून मोहरी घाला. तडतडताच हिंग आणि लाल मिरच्या घाला. काही सेकंद ढवळा. पाणीसोडून सर्व पदार्थ आणि बटाटे घाला. चांगले मिसळा. उरलेले पाणी घाला. एकदा ढवळून उकळी येऊ द्या. आच कमी करा आणि साधारण 5 मिनिटे शिजवा. गरम गरम पूरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा