साहित्य : 1/2 लीटर दही, 2 चमचे गुलकंद, 1/2 वाटी गुलाबाची पानं, दीड वाटी पिठी साखर.
कृती : दह्याला 3- 4 तास पातळ कपड्यात बांधून लटकवून ठेवावे. पाणी पूर्ण निथळल्यावर त्या मिश्रणाला एका भांड्यात काढून त्यात साखर घालून चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर त्या मिश्रणाला चाळणी किंवा बारीक कपड्याने चाळून घ्यावे. गुलकंदामध्ये 2 चमचे गुलाबाच्या पाकळ्या घालून चांगले मिक्स करून दह्याच्या मिश्रणात टाकावे. सर्व्ह करताना उरलेल्या पाकळ्या सजवून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा