Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%b3 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%be 111042000013_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डाळ कांदा

डाळ कांदा चणा डाळ कांदा मसाला
, बुधवार, 20 एप्रिल 2011 (17:50 IST)
साहित्य:- उभा चिरलेला कांदा ३ वाटी, भिजविलेली चणा डाळ अर्धी वाटी, तिखट, मीठ, हळद चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिबीर ३ चमचे, हिरवी मिरची तुकडे अर्धा चमचा, कांदा मसाला १ चमचा, तेल १ डाव, मेथी दाणे अर्धा चमचा, फोडणीचे साहित्य.

कृती:- गॅसवर पातेल्यात गरम तेलात मोहरी तडतडल्यावर हिरवी मिरची तुकडे व मेथी दाणा घाला. नंतर कांदा, हळद, तिखट, मीठ व भिजलेली चणा डाळ घालून कांदा तेलात परता. गॅस कमी करून पातेल्यावर झाकणी झाका. झाकणीवर पाणी ठेवा. कांदा तेलात झाल्यावर थोडं पाणी (झाकणीवरचे) घाला. ही भाजी कोरडी न करता जरा सरसरीत रस्सा भाजी करा. कांदा मसाला घालून गॅस बंद करा. कोथिबीर घालून सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi