साहित्य : 500 ग्रॅम तांदूळ, 500 पिठी साखर, 300 ग्रॅम तूप, वेलची पूड, चाँदीचा वर्ख, बदाम, पिस्ता व काळे मिरेपूड चवीनुसार.
कृती : सातू बनविण्यासाठी तांदुळाला 2 दिवस अगोदर त्याला धुऊन उन्हात वाळवून घ्यावे. नंतर तांदुळाला गुलाबी रंग येईस्तोर परतावे. थंड झाल्यावर त्याला मिक्सरमधून काढून चाळणीने चाळून घ्यावे. तुपाला थोडंसं गरम करून तांदूळ व साखरेच्या मिश्रणात टाकावे व वेलची पूड घालावी. या मिश्रणाला हाताने चांगले मळून घ्यावे व लाडू बांधावे किंवा पीठ तसेच राहू दिले तरी चालेल. त्यावर चाँदीचे वर्ख लावावे व वरून बदाम, पिस्तेच्या कापाने सजवावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा