साहित्य : 3 कप तांदूळ स्वच्छ धुवून 1/2 तास निथळत ठेवलेले, 1 कप तूर डाळ धुतलेली, 1/2 कप तूप, 2 छोटे चमचे मोहरी, 2 छोटे चमचे जिरे, 5 तुकडे दालचिनी, 18 लवंगा, 3 सुक्या लाल मिरच्या, 1/2 छोटा चमचा काळी मिरी, 1 काडी कढी पत्ता, 4 1/2 कप पाणी, 11/2 चमचा हळद, 4 1/2 चमचे मीठ.
कृती : कुकरमध्ये तूप साधरण 3 मिनिटे गरम करून त्यात मोहरी घाला. तडतडताच जिरे, दालचिनी, लवंगा, मिरच्या, काळी मिरी आणि कढी पत्ता घाला. काही सेकंद ढवळा. पाणी, हळद, मीठ घाला आणि ढवळा. तांदूळ आणि तूर डाळ घाला. कुकर बंद करून 3 मिनिटे शिजवा. थंड झाल्यावर गरम गरम वाढा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा