साहित्य : चार लीटर दूध, पाऊण वाटी तांदूळ, दीड वाटी साखर, दहा-बारा वेलदोडे, अर्धे जायफळ, बदाम, केशर, चारोळी.
कृती : तांदूळ स्वच्छ धुऊन, दुधात घालून, दूध आटवत ठेवावे व ते सारखे हालवत राहावे. दूध आटवून निम्मे करावे. नंतर खाली उतरवून थोडे गार झाल्यावर त्यात साखर, वेलचीची पूड, बदामाचे काप व जायफळ उकळून घालावे. हवे असल्यास थोडे केशर घालावे. वर चारोळी पसरावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा