Article Gujarati Dishes Marathi %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95 %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%87 109070600062_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पालक कोफ्ते

पालक कोफ्ते पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : 250 ग्रॅम पालक, 4 टोमॅटो, 2 कांदे, 2 हिरव्या मिरच्या, आलं-लसूण चवीनुसार, 250 ग्रॅम पनीर, 4 मोठे चमचे मैदा, हळद, मीठ, तिखट, धने पूड आवडीप्रमाणे, 1 चमचा साय, 1 लहान चमचा साजुक तुप, तळण्यासाठी तेल.

कृती : पनीर किसून त्यात मैदा मिसळावा. चिमटीभर मीठ घालून त्याचे लहान लहान गोळे तयार करावे. तळण्यासाठी तेल चांगले गरम करावे व त्यात गोळे तळून घ्यावे. 2 वाटी पाण्यात पालकाला चांगले उकळून घ्यावे. नंतर पाणी काढून पालकाची मिक्सरमधून चांगली पेस्ट करून घ्यावी. कांदे, टोमॅटो, आलं, लसूण,‍ हिरव्या मिरच्या, धने पूड, हळद यांची पेस्ट करावी.

एका कढईत 2 चमचे तेल घालून कांदे टोमॅटोची पेस्ट चांगली परतून घ्यावी. नंतर त्यात पालकची पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे. वेगळे काढलेले पालकाचे पाणी व मीठ त्यात घालून उकळी आणावी. आता त्यात पनीरचे गोळे, तुप व साय घालून एक उकळी आणावी. पौष्टिक कोफ्ते बिरयानी सोबत फारच स्वादिष्ट लागतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi