साहित्य : 2 वाटी कणीक, 2 लहान चमचे बेसन, लसूण पाकळ्या पाच ते सहा, 3-4 हिरव्या मिरच्या, 2 वाटी पुदिना पाने, लहान 2 चमचे तीळ, हळद व मीठ अंदाजे, धणे, जिरे पूड 1 चमचा.
कृती : हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या व पुदिना पाने वाटून घ्या. एका बाऊलमध्ये कणीक बेसन मिसळून घ्या. मीठ, हळद, तीळ धणेपूड, जिरेपूड व वाटलेल्या पुदिन्याची पेस्ट घाला व कणीक पाणी लावून भिजवून घ्या. तेलाचा हात लावून मळून घ्या. लहान लहान लाट्या करून पराठा बनवा, गरम तव्यावर तेल लावून भाजून घ्या. थंड आणि गरम असा, दह्यासोबत खायला छान लागतो.