साहित्य : 1 वाटी शिजलेले पुरण (उकळून बारीक केलेली डाळ) 1 वाटी खवा, दीड वाटी साखर, विलायची पूड अर्धा चमचा, काजू बदामाचे पातळ काप पाव वाटी. केशर काड्या अंदाजे.
कृती : वाटलेली डाळ, खवा व साखर एकत्र मिसळून शिजवायला ठेवा. ढवळत राहा. प्रथम पातळ होईल. हालवत हालवत घट्ट येईपर्यंत शिजवा. वरून विलायची पूड, केशर काड्या व काजू बदामाचे काप घाला. मिश्रण तळ सोडू लागेल तेव्हा थाळीला तुपाचा हात लावून वरील पुरणाचे मिश्रण थाळीवर पसरून थंड होऊ द्या, चाकूनं काप पाडा. वेगळ्या चवीची मिठाई सर्वांनाच आवडेल.