साहित्य : मोड आलेले मूग २ वाटी, बारीक चिरलेला कोबी १ टे. स्पून, किसलेले गाजर १ टे. स्पून, सिमला मिरची बारीक चिरलेली १ टे. स्पून, कांदा बारीक चिरलेला १ टे. स्पून, टोमॅटो बारीक चिरलेले १ टे. स्पून, बारीक चिरलेली कोथिंबीर १ टे. स्पून, चाट मसाला १ टी स्पून, चिंच चटणी २ टे. स्पून, पुदिना चटणी २ टे. स्पून, दही २ टे. स्पून, खाकरा ४ किंवा पाणीपुरीच्या पुऱ्या.
कृती : सर्व भाज्या एकत्र करून त्यात दोन्ही चटणी मिक्स कराव्यात. खाण्यापूर्वी बारीक केलेला खाकरा - पाणीपुरीच्या पुरीचा चुरा मिश्रणात घालून त्यामध्ये कोथिंबीर, चाट मसाला घालून भेळ तयार करावी. मूग चाट तयार.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा