ज्ञानमाता मंदिराला
- श्री. गोविंदसिंग राजपूत, इगतपुरी
ज्ञानमाता-मंदिराला-वीट मी देईन म्हणतो।
वीट मी होईन म्हणतो।।धृ।।
पसरला अंधार नगरी, तेजाळले आम्हास त्यांनी।
संस्कृती संस्कार करूनी, घडविले आम्हास त्यांनी।
सागरी त्यांच्या स्मृतीच्या - मनसोक्त मी पोहीन म्हणतो।।
अर्घ्य मी अर्पिन म्हणतो।।1।।
त्या जरी येथून गेल्या, हृदयात अन् प्राणात वसती।
गंधापरी वाहती फुलांच्या, जागेपणी स्वप्नात दिसी।
फूल श्रद्धेचे तयांच्या - चरणावरी वाहीन म्हणतो।।
उतराई मी होईन म्हणतो।।2।।
अजुनी घुमती शब्द त्यांचे, ज्ञानियाच्या मुलुखातुनी।
अमृताची धार अमजुनी, अश्रूत मिळते लोचनी।
भावल्या मूर्तिपुढे त्या - आरती मी गाईन म्हणतो।।
तल्लीन मी होईन म्हणतो।।3।।