Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

गुरु पौर्णिमा 2020 : जाणून घ्या या 13 महान गुरूंचे गुरु कोण होते

Guru Purnima 2020
, रविवार, 5 जुलै 2020 (06:33 IST)
भारतात वैदिक काळापूर्वी पासूनच गुरु-शिष्य परंपरेची पद्धत चालत आली आहे. शास्त्रानुसार जगातील पहिले गुरु भगवान शिव मानले गेले आहे ज्यांचे सप्तर्षी गण शिष्य होते. त्यानंतर गुरूंच्या परंपरेत भगवान दत्तात्रय यांचे नाव प्रामुख्याने घेतलं जात. शिवपुत्र कार्तिकेयला दत्तात्रयाने शिकवणी दिली. भक्त प्रह्लादाला अनासक्तीच्या योगाची शिकवणी देउन त्यांना सर्वोत्कृष्ट राजा बनविण्याचे श्रेय दत्तात्रयेलाच जात. अश्या प्रकारे त्यांचे हजारो शिष्य होते. चला जाणून घेउया अश्या 13 महान गुरूंच्या गुरुचे नाव....
 
1 देवांचे गुरु : सर्व देवांचे गुरुचे नाव बृहस्पती आहे. बृहस्पतीच्या पूर्वी अंगिरा ऋषी देवांचे गुरु असे. प्रत्येक देव कोणा न कोणाचे गुरु होते.
 
2 असुरांचे गुरु : सर्व असुरांच्या गुरुचे नाव शुक्राचार्य असे. शुक्राचार्यांपूर्वी महर्षी भृगु हे असुरांचे गुरु होते. बरेच मोठे असुर होते जे कोण्या न कोण्याचे गुरु देखील होते. 
 
3 भगवान परशुरामाचे गुरु : भगवान परशुरामाचे गुरु खुद्द भगवान शिव आणि भगवान दत्तात्रय होते. 
 
4 भगवान रामाचे गुरु : भगवान रामाचे गुरु ऋषी वशिष्ठ आणि ऋषी विश्वामित्र होते. 
 
5 भगवान श्रीकृष्णांचे गुरु : भगवान श्रीकृष्णाचे गुरु होते गर्ग मुनी, सांदिपनी आणि ऋषी वेदव्यास.
 
6 एकलव्य, कौरव आणि पांडवांचे गुरु : एकलव्य, कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोण होते. 
 
7 भगवान बुद्धाचे गुरु : गुरु विश्वामित्र, अलारा, कलम, उद्दाका, रामपुत्त हे सर्व बुद्धाचे गुरु असे. 
 
8 आचार्य चाणक्यचे गुरु  : चाणक्याचे गुरु त्यांचे वडील चणक होते. महान सम्राट चंद्रगुप्तचे गुरु आचार्य चाणक्य होते. 
 
9 आदीशंकराचार्य आणि लाहिडी महाशयांचे गुरु : असे म्हणतात की महावतार बाबांनी आदिशंकराचार्याला क्रियायोगाची शिकवणी दिली आणि नंतर त्यानी संत कबीर ह्यांना देखील शिकवणी दिली. तत्पश्चात प्रख्यात संत लाहिडी महाशयांना त्यांचे शिष्य असे म्हणतात. याचा उल्लेख लाहिडी महाशयांचे शिष्य स्वामी युत्तेश्वर गिरीचे शिष्य परमहंस योगानंदाने आपल्या पुस्तक ऑटोबायोग्राफी ऑफ योगी'(योगीची आत्मकथा, 1964)मध्ये केले आहे. ज्ञात असले तरी ही आदिशंकराचार्याचे गुरु आचार्य गोविंद भागवत्पाद होते.
 
10 गुरु गोरखनाथांचे गुरु : नवनाथांचे महान गुरु मत्स्येंद्रनाथ (मच्छिन्द्रनाथ) होते. ज्यांना 84 सिद्धांचे गुरु मानले जाते. 
 
11 रामकृष्ण परमहंसाचे गुरु : स्वामी विवेकानंदांचे गुरु महान संत रामकृष्ण परमहंसाचे गुरु महंत नागा बाबा तोतापुरीजी महाराज होते. तोतापुरी बाबांमुळेच त्यांना सिद्धी आणि समाधी मिळाली.
 
12 शिर्डीचे साईबाबांचे गुरु : साईबाबांनी आपल्या गुरूंच्या सर्व निशाण्या आठवणी जपून ठेवल्या होत्या. बाबांच्या गुरुचे खडावा, त्यांची चिलम आणि माळ बाबांनी आजतायगत समाधी घेतल्यावरही जपून ठेवल्या आहेत. त्यांचा कडे एक वीट देखील होती त्याचा संबंध त्यांच्या गुरूशी होत. त्यांचे गुरु सेलूचे वैकुंशा बाबा होते. असे ही म्हणतात की लाहिडी महाशयांकडून त्यांना शक्ती मिळाली होती.
 
13 ओशो रजनीशचे गुरु : महान गुरु आणि संत आचार्य ओशो रजनीशचे तीन गुरु होते मग्गाबाबा, पागलबाबा आणि मस्तो बाबा. या तिघांमुळेच चंद्रमोहन हे ओशो रजनीश बनले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Guru Dakshina महत्व, कधी आणि कशा प्रकारे दिली जाते गुरु दक्षिणा