Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आई पहिली गुरू

आई पहिली गुरू
आषाढी पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. हा आपल्या जीवनात आतापर्यंत जे काही मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि भविष्यात जे करायचे आहे त्याचा संकल्प सोडण्याचा दिवस आहे. आपल्या जे काही प्राप्त झाले त्याची जाणीव करून त्याबद्दल कृतज्ञता म्हणून हा पर्व साजरा करावा.
 
पण या सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली आई. कारण आपल्या जीवनात आपली आई ही सर्वात पहिली गुरु आहे. कारण अगदी गर्भ संस्कारापासूनच शिक्षणाची सुरुवात होते. आपले अपत्य आदर्श सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व बनावे यासाठी आई आपले सर्वस्व पणाला लावून अविरत कष्ट करत असते. 
आईच्या उच्चारणाने मुलांना भाषेचं ज्ञान होतं. लहानपणी आईने सांगितलेल्या गोष्टी, दिलेली शिकवण, अनुभव हे मुलांच्या जीवनावर चिरस्थायी प्रभाव सोडतात. लहानपणी दिलेली शिकवण संपूर्ण जीवन त्याचे मार्गदर्शन करत असते.
 
मातृत्वाला पृथ्वीवर देवत्वाचे रूप प्राप्त आहे. आईचे प्रेम म्हणजे परमात्म्याचा प्रकाश आहे. जीवनाला योग्य वळण देण्यासाठी मार्गदर्शन देण्याचे कार्य आईच करते. म्हणूनच आई ही प्रथम गुरुस्थानी आहे. आई ही पहिली गुरु आणि विद्यापीठ आहे. त्यानंतर शिक्षक, आणि आध्यात्मिक गुरू. म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुसह आईच्या पूजनाचे महत्त्व आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शतकातील सर्वात मोठ्या कालावधीचे खग्रास चंद्रग्रहण