Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

4 शुभ स्थळ, जिथे हनुमानाचा जन्म झाल्याचे दावे केले जातात

4 शुभ स्थळ, जिथे हनुमानाचा जन्म झाल्याचे दावे केले जातात
, शनिवार, 24 एप्रिल 2021 (11:14 IST)
संकट मोचन हनुमानाचा जन्म कुठे झाला याबद्दल अनेक दावे केले जातात. जाणून घ्या अशा 4 जागा ज्या हनुमानाचा जन्म स्थळ असल्याचे म्हटलं जातं.
 
1. हनुमानाचा जन्म हरियाणाच्या कैथल येथे झाला
असे मानले जाते की हनुमान यांचे वडील वानरराज केसरी हे कपि प्रांताचे राज होते. हरियाणाचा कैथल हे पूर्वी कपिस्थळ होतं. काही लोकं याला भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानतात.
 
2. मतंग ऋषींच्या आश्रमात झाला हनुमानाचा जन्म
कर्नाटकाच्या हंपीमध्ये ऋष्यमूकच्या राम मंदिराच्या जवळ मतंग पर्वत आहे. येथे मतंग ऋषींच्या आश्रमात हनुमानाचा जन्म झाला होता. हंपीचं प्राचीन नाव पंपा होतं. पंपा येथे प्रभू श्रीराम - हनुमान यांच्या पहिली भेट झाल्याचं म्हटलं जातं.
 
3. संकेत मोचन हनुमान यांचा जन्म गुजरातच्या अंजनी गुहेत झाला
गुजरातच्या डांग जिल्ह्याच्या आदिवासींचा असा विश्वास आहे येथे अंजनी गुहेत हनुमानाचा जन्म झाला होता.
 
4. झारखंडच्या आंजन गावातील गुहेत झाला बजरंबली यांचा जन्म
काही लोकांप्रमाणे झारखंडाच्या गुमला जिल्ह्यातील आंजन गावात हनुमान यांचा जन्म झाला होता. तिथे एक गुहा आहे, असे म्हटले जाते की ते भगवान हनुमानाचे जन्मस्थान आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनुमान जयंती 2021 : 27 एप्रिलला Hanuman Jayanti, जाणून घ्या शुभ मुहूर्त