पवनपुत्र हनुमान महादेवाच्या आकाराव्या अवतार स्वरूपात सर्वत्र पूजनीय आहे. ते शक्ती आणि बुद्धीचे देव आहे. अनेक मंदिरात त्यांची डोंगर उचलणारी आणि राक्षसाची मान मुरगळणारी मूर्ती शोभून दिसत असली तरी ते श्रीराम मंदिरात रामाच्या चरणी मान खाली घालून बसलेले दिसतात.
देवांचे देव शिवदेखील रामाचे नामस्मरण करतात म्हणून त्यांचा अवतार हनुमानदेखील रामभक्त आहे. कोणतीही रामकथा हनुमानाशिवाय अपूर्ण आहे.
पुढे वाचा हनुमान का नाही घेऊन आले सीताला?..
एका प्रसंगाप्रमाणे एकदा ते माता अंजनीला रामायण ऐकवतं होते. त्यांची कथा ऐकून मातेने विचारले की आपण इतके शक्तिशाली आहात की शेपूटने अक्खी लंका जाळू शकता, रावणाला मारू शकला असता आणि सीता मातेला सोडवू शकला असता तर आपण हे का केले नाही? जर आपण असे केले असते तर युद्धात वाया गेलेला वेळ वाचला असता.
यावर हनुमान माता अंजनीला सांगतात की प्रभू श्रीराम यांनी मला असे काही करायला सांगितले नव्हते. मी तेवढंच करतो जितकं प्रभू मला आज्ञा करता आणि त्यांना माहीत आहे की मला काय करायचे आहे. म्हणून मी आपली मर्यादा न ओलांडता तेवढंच करतो जेवढं मला सांगण्यात येतं.
प्रभू रामाप्रती हनुमानाची अगाध श्रद्धा आणि प्रेम हेच कारण आहे की ते सर्वत्र पूजनीय आहे.
कोणताही हनुमान भक्त हनुमान जयंतीला, मंगळवारी आणि शनीवारी हनुमान चालीसाचा सात वेळा पाठ करेल, त्याचे कष्ट दूर होतील.