Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हनुमान जयंतीवर वाचा मनोकामना पूर्तीचे 5 सोपे उपाय

हनुमान जयंतीवर वाचा मनोकामना पूर्तीचे 5 सोपे उपाय
तसंतर हनुमान मंत्राचा प्रयोग कोणत्याही शुभ मुहूर्त मंगळवारी किंवा शनीवारी केला जाऊ शकतो पण हनुमान जयंतीवर केले जाणारे पूजन लाभकारी असतं.
 
या मंत्राचा जप करण्यापूर्वी हनुमानाला यथाशक्ति पूजन चंदन, रक्तपुष्प, शेंदूर, बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य, लाल वस्त्र, पान, यज्ञोपवीत व इतर सामुग्री चढवावी. रक्त कंबलच्या आसनाचा उपयोग यथेष्ट आहे. रक्त प्रवालची माळ नसल्यास रुद्राक्षाची माळ घेऊ शकता.
(1) रोजगार-ऐश्वर्य प्राप्तीसाठी हनुमंत गायत्री मंत्राची यथाशक्ति 11-21-51 माळ करा. हवन करा. मंत्र सिद्ध होईल. नंतर नित्य 1 माळ जपा.
 
'ॐ ह्रीं आंजेनाय विद्महे, पवनपुत्राय
धीमहि तन्नो: हनुमान प्रचोद्यात्।।' 

(2) मनोरथ पूर्तीसाठी मंत्र-
 
'ॐ नमो भगवते आंजनेयाय महाबलाय स्वाहा।' 
webdunia
(3) संकट, बंधन मुक्ती आणि शत्रू संहारासाठी: वरील विधीप्रमाणे या मंत्राचा जप करा.
 
'ॐ नमो भगवते हनुमते महारुद्राय हुं फट स्वाहा।' 

(4)  सिद्धी प्राप्तीसाठी: सतत विधिपूर्वक जप केल्याने हनुमान स्वत: दर्शन देऊन किंवा त्यांची प्रचीती होऊन ते वर प्रदान करतात.
'ॐ हं पवन नंदनाय स्वाहा'
webdunia
(5 ) ​शत्रू आणि क्रोध नाश करण्यासाठी: मोहरीच्या तेलाने हनुमानाला अभिषेक करावा. ज्यांना क्रोध अधिक येतो त्याने या मंत्राचा जप नेहमी किंवा काही दिवस तरी करावा. या मंत्राचा जप केल्याने सुख-शांती मिळते.
 
मंत्र- 'ॐ नम: शिवाय ॐ हं हनुमते श्री रामचन्द्राय नम:।' 
 
या व्यतिरिक्त 'श्री विचित्र‍वीर्य हनुमन्न्माला मंत्र, श्री हनुमद्डबवानल स्तोत्र, हनुमत् स्तोत्र, शतनाम, सहस्रनाम, लांगूलास्त्र-शत्रुंजय हनुमत स्तोत्र, एकमुखी हनुमत् कवच, पंचमुखी हनुमत् कवच, सप्तमुखी हनुमत् कवच, एकादशमुखी हनुमत् कवच इतर पाठ व अनुष्ठान केले जाऊ शकतात.
 
या दिवशी ध्वज-पताका, दीपदान केलं जातं. अनुष्ठान नंतर 13 बटुंना भोजन करवावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मारुती(हनुमान)चे 108 नावं