Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हनुमानाला शेंदूर लावण्यामागचे हे कारण फार कमी लोकांना माहिती असावे

हनुमानाला शेंदूर लावण्यामागचे हे कारण फार कमी लोकांना माहिती असावे
हनुमान संकटमोचन म्हणून प्रसिद्ध आहे अर्थात संकट दूर करणारे. हनुमान जयंतीला यांच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. हनुमानाचा शेंदुराने शृंगार केला जातो. यामागे एक रोचक कहाणी आहे.
 
प्रचलित कथेनुसार एकदा हनुमानाला भूक लागली तर ते भोजनासाठी सीता मातेकडे गेले. तेव्हा त्यांनी माता सीतेला कुंकू(सिंदूर) लावताना बघितले तर त्यांनी हैराण होऊन विचारले की माते आपण कुंकू का लावता? तेव्हा सीतेने सांगितले की हे शेंदूर आहे आणि हे लावल्याने आपल्या स्वामीचे आयुष्य वाढतं.
 
हे ऐकल्यानंतर हनुमानाने विचार केला की चिमूटभर शेंदुराने स्वामींचं आयुष्य वाढतं तर पूर्ण शरीरावर शेंदूर लावल्याने आपले स्वामी श्रीराम नेहमीसाठी अमर होतील. तेव्हा हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतले आणि प्रभू श्रीरामाच्या सभेत पोहचले. हनुमानाचा हा रूप बघून सर्व हसू लागले. परंतू श्रीराम स्वत:प्रती त्यांचे प्रेम बघून आनंदी झाले. त्यांनी हनुमानाला वरदान दिले की जो कोणी मनुष्य मंगळवार आणि शनिवार हनुमानाला तुपासह शेंदूर अर्पित करेल त्यावर स्वयं रामाची कृपा राहील आणि त्याच्या सर्व अडचणी दूर होतील.
 
तसेच सीतामातेच्या शेंदुरामुळे अमर झाले हनुमान
लंका विजयानंतर प्रभू राम-सीता अयोध्येत आले तर वानर सेनेला विदाई दिली गेली. तेव्हा हनुमानाला विदाई देताना सीतेने आपल्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला घातली. बहुमूल्य मोती आणि हिर्‍यांनी घडवलेली माळ बघून देखील हनुमान प्रसन्न झाले नाही कारण त्यावर प्रभू श्रीराम हे नाव नव्हते. तेव्हा सीता म्हणाली की याहून मौल्यवान वस्तू तिच्याकडे कोणतीच नाही म्हणून शेंदूर धारण करून आपण अजर-अमर व्हा. तेव्हापासून हनुमानाला शेंदूर अर्पित केले जाऊ लागले. या शेंदुरामुळे हनुमान अजर-अमर आहे. त्यांची पूजा केल्याने सर्व अडथळे दूर होतात.
 
अनंत ऊर्जेचा प्रतीक आहे शेंदूर
विज्ञानाप्रमाणे प्रत्येक रंगात विशेष प्रकाराची ऊर्जा असते. हनुमानाला शेंदूर अर्पित केल्यावर जेव्हा भक्त याने तिलक करतात तेव्हा दोन्ही डोळ्यामधील स्थित ऊर्जा केंद्र सक्रिय होऊन जातं. असे केल्याने मनात चांगले विचार येतात आणि सोबतच परमात्म्याची ऊर्जा प्राप्त होते. हनुमानाला तूप मिश्रित शेंदूर चढवल्याने अडथळे दूर होतात. या कारणामुळेच मंदिरांमध्ये हनुमानाला शेंदूर अर्पित केलं जातं.
पासून हनुमानाने संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घ्यायला सुरुवात केली. यामुळे हनुमानाला शेंदूर लावला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खरमास समाप्त, जाणून घ्या येणार्‍या महिन्यात विवाह आणि शुभ कार्यांसाठी शुभ दिवस