Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी

- समर्थ रामदासस्वामी

hanuman jayanti
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।
करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।
गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।
सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।

जय देव जय देव जय हनुमंता ।।
तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।

दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।
थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।
कडकडिले पर्वत उडुगणउच्छेद ।।
रामी रामदासा शक्तपचा शोध ।।
जय देव जय देव जय हनुमंता ।। २ ।।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Soul after suicide आत्महत्या केल्यानंतर आत्मे बरोबर काय होत?