Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खिडकी

खिडकी
, मंगळवार, 5 जानेवारी 2016 (15:48 IST)
तुम्ही जितके जागृत आहात त्या प्रमाणात अवतीभवती सार्‍या गोष्टींकडून तुम्हाला ज्ञान मिळेल. तुम्ही जर का, जागृत नसाल तर मूल्यवान ज्ञानसुद्धा तुम्हाला अर्थहीन वाटते. (अचानक बाहेरून खूप आवाज येऊ लागला आणि किरण खिडकी बंद करायला गेला.)
 
तुमच्या खिडकी उघडी व बंद करण्याचा क्षमतेवर जागृती अवलंबून असते. जेव्हा बाहेर वादळ असते तेव्हा तुमची खिडकी बंद करावी लागते. नाहीतर तुम्ही ओलेचिंब व्हाल. जेव्हा आत उकाडा आहे आणि गुदमरलसारखे होते, तेव्हा तुम्हाला खिडकी उघडायला लागेल.
 
तुमची इंद्रिये खिडक्यांप्रमाणे आहेत. जेव्हा तुम्ही सजग असता तेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या खिडक्या उघडू आणि बंद करू शकता. तेव्हा तुम्ही स्वतंत्र असता.
 
तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या खिडक्या बंद अथवा उघडू शकत नसाल तर तुम्ही गुंतलेले आहात. त्याकडे लक्ष देणे म्हणजेच साधना किंवा आधत्मिक अभ्यास होय.
 
श्री श्री रविशंकर, ‘मौन एक उत्सव’ मधून साभार

Share this Story:

Follow Webdunia marathi