Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चाणक्य प्रमाणे अश्या मुलीशी विवाह करणे योग्य नाही

चाणक्य प्रमाणे अश्या मुलीशी विवाह करणे योग्य नाही
लग्नासाठी मुली शोधत असाल तर सर्वात आधी आपण तिचं सौंदर्य बघता पण केवळ सुंदरतेवर भुलू नका. मनाची सुंदरता विसरू नका. मुलीच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर आणि शरीराच्या भूमितीवर करणे आपल्यासाठी कष्टकारी ठरू शकतं. म्हणून येथे काही टिप्स देण्यात येत आहे. चाणक्यप्रमाणे दिसायला सुंदर आणि आकर्षक असल्या तरी या मुलींशी विवाह करू नका:
धांदरट/वेंधळी/वेडपट- चेहर्‍याने सुंदर पण कमी डोकं असलेली मुलगी निवडणं योग्य ठरणार नाही. एक दोन भेटीत तिचा वेडपटपणा आपल्याला चंचल स्वभावाची आहे म्हणून आवडू शकतो पण जीवनभर तो कामाचा नाही हे लक्षात घ्या.

कुळाला शोभणारी: आपल्या कुळाला शोभणारी मुलगी आपलं घर सांभाळू शकते. आपल्या कुळापेक्षा अती उच्च किंवा अती नीच कुळाची मुलगी घराचा नाश करू शकते. विवाहात कन्याचे गुणच कुटुंब सावरायला सहायक असतात.
 
कडू बोलणारी: वाईट आणि कडू बोलणार्‍या मुलीचा स्वभावही वाईटच असतो. अश्या स्त्रीमुळे घरातील वातावरण नेहमी नकारात्मक राहील. ज्यामुळे घरात अशांती आणि इतरांशी संबंध खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
webdunia

कजाग: अशिष्ट आणि कजाग स्त्रीशी लग्न करणे योग्य नाही. अश्या मुली नवर्‍याला दाबून ठेवतात. स्वत:चा वर्चस्व गाजवतात आणि आपल्या इच्छांप्रमाणे काम करतात.
 
खोटारडी: च्या स्त्रीला खोटं बोलण्याची सवय असेल ती आपल्याला कधीही धोका देऊ शकते. अशाने कुटुंब तुटण्याची वेळ येते. 
webdunia

देव-धर्म न मानणारी: जी मुलगी देवपूजा मानत नाही किंवा तिच्या मनात परमात्मा विषयी श्रद्धा- विश्वास नाही अश्या मुलीशी लग्न करू नये. अशी स्त्री मुलांना संस्कार देण्यात कमी पडेल.

अनैतिक संबंध ठेवणारी:  हल्ली प्रेम विवाहात मुला-मुलींना एकमेकाबद्दल सर्व काही माहीत असतं. पण जी मुलगी आधीपासून कोणच्या प्रेमात होती, तिचे त्यासोबत संबंध होते हे माहीत असूनही जर आपण त्या स्त्रीशी लग्न करायला तयार असाल तर सावध व्हा. ती कधीही आपल्या धोका देऊ शकते.
webdunia

 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुरुपोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा