Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जीवदया

जीवदया
, बुधवार, 4 मार्च 2015 (15:57 IST)
गीता 16/2 मध्ये ‘दया भुतेषू’ असे नमूद करण्यात आले आहे. सर्व प्राण्यांविषयी हेतूरहित दया, लोकांना 
 
दु:खी पाहून तेथे स्वार्थरहित त्या दु:खाला दूर करण्याची क्रिया म्हणजे दया म्हटली जाते. दुसर्‍याला दु:ख न देणे ही अहिंसा व सुख पोचविणे ही दया आहे. अहिंसा व दयात एवढे अंतर आहे. भूतदया, जीवदया अहिंसेच्या   स्थितीत काय करावाचे हे दाखवितात.
 
स्मृती आणि गुह्यसूत्रात पाच कर्मे नमूद होतात. ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, देवयज्ञ, भूतयज्ञ, नृय . या गोष्टी विश्वातील अनेक धर्मग्रंथात सातत्याने आढळतात.
 
माणूस आपले सुख आणि स्वार्थपूर्तीकरिता दुसर्‍याबद्दल दा दाखवितो. लोकांचे दु:ख दूर करणारे लोक सर्वसाधारण लोक असतात. कारण त्यांना आपल्यावरील अनुभवाने दुसर्‍याचे दु:ख कळत असते. सर्व सुखी व्हावेत ही भावना असते. पण ही सेवा अहंकाररहित असावी लागते. त्याकरिता असमर्थ असणारे देवाची प्रार्थना करतात.
 
संत महात्मा मात्र प्रतिकूल स्थिती आली की ती देवाची कृपाच समजतात व दुसर्‍याचे दु:ख स्वत:कडे घेतात. त्याची दया विशेष शुद्ध असते.
 
भगवंताची दाया सर्वानाच शुद्ध करण्याची असते. भक्तजन यात दोन प्रकार मानतात. ते म्हणजे कृपा व दया. पापापासून शुद्ध करणे म्हणजे कृपा आणि अनुकूल स्थिती पाठविणे ही दया संबोधली गेली आहे. बृहदारणेपनिषद, जाबालीदर्शनोपनिषद, महाभारत यातून यावर विवेचन आहे. सत्पुरुष तर सर्वावर दयाच करीत असतात. धर्म  अनुरागी दयेला श्रेष्ठ धर्म मानतात. क्रूरतेचा अभाव ती दया, क्षमा मोठे बल आहे, परमात्मचा यथार्थ बोध होणे ज्ञान आहे. समचित्त होणे आर्जव आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, पद्मपुराण व सर्व उपपुराणात आत्मतत्त्व म्हणून समदृष्टीचा उपदेश आहे. यामुळे सनातन काळापासून याचे महत्त्व दिलेले आहे. मनाचा दु:खपूर्ण प्रवाह जो कोणत्याही दु:खी व्यक्तीच्या दु:खास दूर करण्याची प्रेरणा देतो, त्याला दया म्हणतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi