Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तर्कनिष्ठ

तर्कनिष्ठ
, मंगळवार, 24 नोव्हेंबर 2015 (14:42 IST)
तुम्ही फक्त तेच करता जे सहेतुक, उययोगी आणि तर्कसुसंगत आहे. आपण पाहतो ते सारे तर्कसुसंगत मनातून पाहतो. पण अंत:करण एखादा शोध, नवीन ज्ञान हे तर्कनिष्ठ मनापलीकडचे असते. सत्य हे हेतू पलीकडचे असते.
 
तर्कनिष्ठ मन हे खाचेत अडकविलेल्या रेल्वेच्या मार्गाप्रमाणे असते. सत्याला रुळलेल्या मार्गाची गरज नसते. सत्य एखाद्या फुग्याप्रमाणे अधांतरी तरंगू शकते. काही लोक तर्कनिष्ठ मनाविरुद्ध वागतात. समजाशी बंड पुकारण्यासाठी त्यांना सामाजिक नियम तोडाचे असतात. पण त्याचे कारण असते राग, द्वेष, भांडखोरवृत्ती आणि दुर्लक्षिले जाणे. यातून निर्माण झालेला अहंकार, तर्कनिष्ठ मनातून बाहेर पडणे नव्हे. (जरी ते तसे समजतात.)
 
जेव्हा आपण एखादी गोष्ट निर्हेतुकपणे करतो तेव्हा आपण तर्कनिष्ठ मनापासून दूर होतो. जर त्यात हेतूच नसेल तर कृती हा एक खेळच होतो. जगणे हलकेफुलके होते.

तुम्ही जर फक्त तर्कनिष्ठ कृतीशीच चिकटून राहिलात तर जगणे हे एक ओझे होते. जर तुम्ही एखादा खेळ यशापयाशाचा हेतू न ठेवता खेळलात, जर तुम्ही एखादी गोष्ट मोकळेपणाने केली नाहीत, अगदी असमंजसपणे वागा तर त्यातच खरा मोकळेपणा आहे. एखाद्या नाचासारखा.
 
श्री श्री रविशंकर ‘मौन एक उत्सव’ मधून साभार

Share this Story:

Follow Webdunia marathi