Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम्ही भूत बघितला आहे का?

तुम्ही भूत बघितला आहे का?

वेबदुनिया

भूत खरोखरच असतं का? असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. मात्र, आपण भूत पाहिलं आहे, असं सांगणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. जर भूत ही निव्वळ अंधश्रद्धा असेल, तर ती अजूनही अस्तित्वात कशी? बऱ्याच जणांना भूतं कशी काय दिसतात? आणि आपल्यालाच का दिसत नाही, असा प्रश्नही तुम्हाला पडत असेल...

भूत योनीबद्दल शास्त्रांमध्ये दिल्या गेलेल्या माहितीनुसार ही योनी अस्तित्वात असते. मानवाचा जन्म पंचमहाभूतांपासून झाला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश असी ती पंचमहाभूतं आहेत. मृत्यूनंतर माणूस या पंचतत्वांमध्येच विलीन होत असतो. मात्र या पंचमहाभूतांमधील एका तत्वाचं प्रमाण आपल्यामध्ये जास्त असतं, ते म्हणजे पृथ्वी.. म्हणजेच माती. त्यामुळे मृत्यूनंतर शरीराची राख होते.

याउलट भूत योनीमध्ये वायू तत्वाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे या योनीतील आत्मे आपल्याला स्थायी रुपात न दिसता वायू रुपात आभासी पद्धतीने दिसतात. मात्र ज्या व्यक्तींचा राक्षस गण असतो, त्यांना वातावरणातील अमानवी गोष्टींचा आभास प्रखर रुपात होतो. त्यामुळे भुतांचं दर्शन या योनीतील माणसांना घडतं. इतरवेळी भूत दिसणं अशक्य असतं. हे यामागील शास्त्र आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi