Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

निर्जला एकादशी (भीमसेनी एकादशी)

निर्जला एकादशी (भीमसेनी एकादशी)
, गुरूवार, 16 जून 2016 (12:42 IST)
वर्षाच्या सर्व एकादशींमध्ये निर्जला एकादशीचे फार महत्त्व आहे. पद्म पुराणानुसार ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला निर्जला एकादशी म्हटले जाते. याला 'पांडव एकादशी'च्या नावाने देखील ओळखले जाते. या उपासात पाणीही न पिता उपास केला जातो.  
 
तिथी : ज्येष्ठ शुद्ध एकादशी
 
इतिहास : ‘पांडवांतील भीमाचा आहार विलक्षण. भीमाला सर्व एकादश्यांना उपवास करणे शक्य नव्हते; म्हणून त्याने व्यासांच्या उपदेशानुसार ज्येष्ठ शुद्ध एकादशीला पाणीही न पिता उपवास केला आणि सर्व एकादश्यांच्या उपवासाचे पुण्य जोडले.’
 
महत्त्व : निर्जला एकादशीचे व्रत विधीपूर्वक केल्यास वर्षात दुसरी कोणतीही एकादशी न करताही सर्व एकादश्यांचे पुण्य मिळते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एकादशी व्रत