Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंत्रांमध्ये असणारी शक्ती

मंत्रांमध्ये असणारी शक्ती
परिवार रक्षामंत्र
अरिहे सर्व रक्ष हँ फट् स्वाहा। हा कुटुंबाचे संरक्षण करणारा मंत्र रोज सकाळी आणि सायंकाळी १ माळ जपून म्हटल्याने आलेले संकट दूर होते.
 
रोगनिवारक मंत्र
नमो विप्पोसही पत्ताणं नमो खेलो सहि पत्ताणं नमो जल्लो सहि पत्ताणं नमो सव्बो सहि पत्ताणं स्वाहा। हा मंत्र म्हणत दररोज एक माळ जपल्याने सगळ्या प्रकारच्या रोगांपासून मुक्ती मिळते. आपले कष्ट कमी होतात.
 
द्रव्यप्राप्ती मंत्र
ह्यी नमो अरिहंताणं सिद्धाणं आयरियाणं उवज्झायाणं साहूणं मम ऋद्धि-वृद्धी-समीहितं कुरू कुरू स्वाहा। या मंत्राचे दररोज सकाळ, दुपार, सायंकाळी प्रत्येक वेळी ३२ वेळा मनातल्या मनात जप केल्याने सुख-समृद्धी, धनलाभ आणि कल्याण होते.
 
ह्यी श्री कलिकुंड स्वामिने नम:।
या मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने कठिणातील कठीण काम सिद्धीस जाते. गरिबी दूर होऊन लक्ष्मी प्राप्ती होते.
 
नमो भगवते श्री पार्श्‍वनाथाय क्षेमं कराय ह्यी नम:।
या मंत्राचा जप केल्याने अचानक येणारे संकट आणि भीती दूर होते.
 
ह्यी श्री हर-हर स्वाहा।
हा मंत्र दररोज १0८ वेळा जप केल्याने रोग, संकट आणि कोणत्याही प्रकारची चिंता दूर होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi