Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी म्हणी/मराठी प्रोव्हर्बस

webdunia

वेबदुनिया

घरच झाल थोड त्यात व्याहिनी धाडलं घोड..

अर्थ : आधीच कामाने/ कोणत्याही गोष्टीने कंटाळा आलेला असतो आणि दुसर कोणीतरी येवून परत तेच काम सांगत...

तुझ माझ जमेना आणि तुझ्यावाचून करमेना..

अर्थ : दोन व्यक्तींचे नुसते वाद होत असतील पण जर त्या व्यक्ती सोबत नसतील तर एकमेकांची आठवण काढत असतील/ त्यांना एकमेका शिवाय करमत नसेल तर त्यासाठी हि म्हण वापरतात..

नकटीच्या लग्नाला १७ विघ्ने
अर्थ   - एखाद्या गोष्टीत आधीच अडचणी असताना त्यात आणखीन संकटांची भरच पडते.

अति तिथे माती...
अर्थ -- कोणत्याही गोष्टीची अतिशयोक्ती केल्यास त्याची माती होते म्हणजेच हाती काहीच लागत नाही...काहीच निष्पन्न होत नाही...

अति शहाणा त्याचा बैल रिकामा
अर्थ --- प्रत्येक कामामध्ये जास्त चिकित्सा करत बसल्यास कोणतेच काम पूर्ण होत नाही

पुढे पहा गंमतशीर म्हणी...

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
अर्थ --- कोणत्याही चांगल्या कामात विघ्ने आणणाऱ्या विघ्नसंतोषी लोकांमुळे चांगले काम होण्याचे राहत नाही...ते काम पूर्ण होतेच

लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषा
अर्थ -- इतरांना चांगल्या गोष्टी सांगून स्वतः मात्र त्यावर अवलंब(त्या गोष्टींचा स्वतः साठी वापर) न करणे

अळी मिळी गुपचिळी
अर्थ --- स्वताच्या मनातील हेतूचा दुसर्याला सुगावा न लागू देण

पडत्या फळाची आज्ञा..
अर्थ : एखादी गोष्ट करायची असते पण अविर्भाव असा असतो जस काय दुसर्यांनी सांगितलं म्हणून केलाय...

नावडतीच मीठ पण अळणी असत...
अर्थ : एखादी व्यक्ती आवडत नसेल तर त्या व्यक्तीने किती पण चांगल काम केल तरी त्यांना नाव ठेवणे..


Share this Story:

Follow Webdunia Hindi