Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाभारतातील 'गीता'मधील संवाद

महाभारतातील 'गीता'मधील संवाद
श्रीकृष्णाने अर्जुनाला हे सांगितले आहे की गीतेमधले तत्त्वज्ञान माणसाला त्याच्या व्युत्पत्तीच्या वेळेसच सांगण्यात आले आहे.
 
फलाची अपेक्षा न धरता नियोजित कर्मे करून ईश्वराची भक्तीपूर्वक आराधना केली म्हणजे मनुष्याला पुनर्जन्ममरणाच्या फेर्‍यातून मुक्ति मिळते.
 
श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मनावर आलेले मोह आणि अज्ञानाचे सावट दूर करून त्याला त्याचे क्षत्रियाकडून अपेक्षित असे असलेले युध्दकर्तव्य पार पाडण्यास प्रवॄत्त केले.
 
"धृतराष्ट्र म्हणाला,
पंडूच्या अन् अमुच्या पुत्रां होउन युध्दज्वर
करति काय कुरूक्षेत्री ते मी जाणाया आतुर १"
"संजय म्हणाला,
पांडवसेनेची झालेली रचना पाहून
भीष्माचार्यांसमीप जाउन वदला दुर्योधन २"
 
"यापेक्षा मी स्वस्थ रहातो टाकुनिया आयुधे
कल्याणच मम होइल कौरवहस्ते मरण्यामधे? ४६
 
बोलुनि इतके खालि ठेविले धनुष्य अन् बाण
अन् रथामधि बसुन राहिला खिन्नमने अर्जुन ४७
"
 
"अश्रूंनी डोळे डबडबलेले आणि मन खिन्न
अशा अर्जुना पाहुनि वदते झाले मधुसूदन १"
 
"अर्जुन म्हणाला,
श्रीकॄष्णा, हे भीष्म, द्रोण या परमपूज्य व्यक्ती
त्यांना मारायासाठी मी आणु कुठुन शक्ती ४"
 
"आम्हि जिंकावे अथवा त्यानी या पर्यायात
मला केशवा योग्य काय ते हे नाही कळत
ज्याना मारून आम्ही उरावे हे न मना पटते
तेच उभे सामोरि लढाया, मम कौरव भ्राते ६"
 
"संजय म्हणाला,
इतुके सारे सांगुनी अर्जुन कॄष्णासी बोलला
""नाही मी लढणार"" म्हणुनिया स्तब्ध उभा राहिला ९"
 
"श्री भगवान म्हणाले,
""शोकासाठी पात्र जे न तू विचार त्याचा करिशी
आणिक मोठया विद्वानासम भाषण पण देशी
अरे कुणी जगला वा मेला शोक न पंडित करती
अन् मरण्या मारण्यावरून तुझि कुंठित होते मती ? ११"

Share this Story:

Follow Webdunia marathi