रुद्राक्ष जितकं लहान असतं तेवढंच प्रभावी असतं. पण ज्याला भोक नसेल, जे किड्याने भक्षण केलेलं असेल असे रुद्राक्ष धारण करू नये.
शिवपुराणाप्रमाणे कोणीही रुद्राक्ष धारण करू शकतं. रुद्राक्षाचे चौदा प्रकार असतात. त्याचे विभिन्न फळ आणि धारण करण्यासाठी विभिन्न मंत्र आहे.
पुढे वाचा चौदा मुखी रुद्राक्ष आणि त्यांना धारण करण्याचे मंत्र:
लक्ष्मी प्राप्ति, भोग आणि मोक्षसाठी धारण मंत्र: 'ॐ ह्रीं नम:'
इच्छा पूर्तीसाठी धारण मंत्र-'ॐ नम:'
विद्या प्राप्तीसाठी धारण मंत्र- 'ॐ क्लीं नम:'
धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्तीसाठी धारण मंत्र- 'ॐ ह्रीं नम:'
मुक्ति आणि इच्छित फळ मिळविण्यासाठी धारण मंत्र- 'ॐ ह्रीं क्लीं नम:'
पापापासून मुक्तीसाठी मंत्र- 'ॐ ह्रीं ह्रुं नम:'
ऐश्वर्य प्राप्तीसाठी मंत्र- 'ॐ हुं नम:'
दिघार्यु जीवनासाठी मंत्र- 'ॐ हुं नम:'
सर्व कामना पूर्तीसाठी मंत्र हे डाव्या हातात या मंत्राचा जप करत धारण करावे- 'ॐ ह्रीं ह्रुं नम:'
संतान प्राप्तीसाठी मंत्र- 'ॐ ह्रीं नम:'
सर्वत्र विजय प्राप्त करण्यासाठी मंत्र- 'ॐ ह्रीं ह्रुं नम:'
आरोग्यासाठी फायदेशीर- 'ॐ क्रौं क्षौं रौं नम:'
सौभाग्य आणि मंगळ प्राप्तीसाठी मंत्र- 'ॐ ह्रीं नम:'
सर्व पापे नष्ट करतं. याचे धारण मंत्र- 'ॐ नम:'
याव्यतिरिक्त एक गौरीशंकर रुद्राक्षही असतं. हे सर्व सुख देणारं असतं. ॐ नम: शिवाय चा जप करून हे रुद्राक्ष धारण केलं जाऊ शकतं.