Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांचे 10 उपाय, घरात सुख-समृध्‍दी नांदेल

नवरात्रीमध्ये विड्याच्या पानांचे 10 उपाय, घरात सुख-समृध्‍दी नांदेल
, रविवार, 3 ऑक्टोबर 2021 (10:58 IST)
1. नवरात्रीला एका विड्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवून दुर्गा देवीला अर्पित करा. हा उपाय धन आगमन सोपं करण्यात सर्वात अचूक आहे.
2. नवरात्रीत मंगळवारी एक संपूर्ण पान घेऊन त्यावर लवंग आणि वेलची ठेवा. याचा विडा तयार करा. हनुमान मंदिरात जाऊन हा विडा अर्पित करा. कर्जापासून मुक्तीसाठी हा सर्वात अचूक उपाय आहे.
3. विड्याच्या पानावर दोन लवंगा ठेवून दोन्ही हाताने पाण्यात प्रवाहित करावे. अपुरी इच्छा पूर्ण होईल.
4. विड्याच्या पानाच्या गुळगुळीत बाजूला शेंदुराने श्रीराम लिहा आणि नवरात्रीमध्ये येणार्‍या मंगळवारी हनुमानाला अर्पित करा. हे पान हनुमानाच्या पायाशी ठेवू नये कारण हनुमान प्रभू श्रीरामाचे भक्त आहे. म्हणून पान केवळ त्यांच्या समोर ठेवावं किंवा आशीर्वाद मुद्रा असलेल्या हातावर चिकटवावे. या उपायाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल.
5. जर इच्छित प्रगती होण्यात अडथळे निर्माण होत असेल तर एका पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावून हे पान नवरात्रीत दुर्गा देवीला अर्पित करावं, नंतर हे पान स्वत:जवळ ठेवून झोपावं. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून विड्याचं पान एखाद्या दुर्गा देवीच्या मंदिराच्या मागील बाजूला ठेवून द्यावं, हे पान फेकू नये.. हा उपायाने प्रगतीचा रस्ता मोकळा होईल.
6. व्यवसायात मंदी जाणवत असल्यास नवरात्रीत 9 दिवस नियमाने एका निर्धारित वेळेवर विड्याचं पान दुर्गा देवी मंदिरात जाऊन अर्पित करावं. यासाठी एक निश्चित वेळ निर्धारित करून घ्या.
7. आपली आकर्षण शक्ती आणि प्रभाव वाढवण्यासाठी 9 दिवस सकाळी 4 ते 6 या दरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्यसुंदरी देवीचं ध्यान करून विड्याच्या पानांचे मूळ घासून त्याने तिलक करावं. अशाने आपल्या गोष्टीचं महत्त्व वाढेल तसेच सुंदरता आणि आकर्षण देखील वाढेल.
8. दारिद्र्य आणि आर्थिक समस्यांना सामोरा जात असल्यास नवरात्रीच्या सुरुवातीच्या 5 दिवस एका विड्याच्या पानावर ह्रीं लिहून दुर्गा देवीला अर्पित करा आणि महानवमी नंतर ते 5 विड्याचे पान पैसे ठेवत असलेल्या जागेवर ठेवा. हा उपाय निश्चित आपल्या आर्थिक समृद्धी सदृढ करेल.
9. घरात नकारात्मक ऊर्जेचा वास असल्यास घरातील शांती प्रभावित होते तर नवरात्रीत 9 दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावली पाठ करा. याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल. नवरात्रीपासून घरातून निघताना दुर्गा चालीसा पाठ करा. दर मंगळवार आणि रविवार कुटुंबाच्या सदस्यांसोबत विड्याचं सेवन करा.
10. संतान प्राप्तीची इच्छा असल्यास नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला 9 विडे अर्पित करा आणि 9 संतान असलेल्या सवाष्णींना सौभाग्याच्या वस्तू भेट करा.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सर्वपितृ अमावस्या रोचक पौराणिक कथा