Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रजनीकांत ज्यांचे भक्त आहे ते ''महावतार बाबा'' जिवंत आहे 5 हजार वर्षांपासून, काय ते कृष्ण आहे?

mahavatar babaji
, मंगळवार, 19 जानेवारी 2021 (13:34 IST)
अनेक असे लोकं आहे ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं की ते हजारो वर्षांपासून जिवंत आहे. अश्वत्थामा, हनुमान, जामवंत, विभीषण, पराशुराम, महर्षि व्यास, कृपाचार्य, राजा बली इतर. आधुनिक काळात देवहरा बाबा, त्रैलंग स्वामी, शिवपुरी बाबा, संत लोकनाथजी इ. याच प्रकारे महावतार बाबा यांच्याबद्दल म्हटलं जातं की ते मागील 5000 वर्षांपासून जिवंत आहे आणि हिमालयाच्या एका गुहेत त्यांना आजदेखील बघता येतं. त्यांच्याबद्दल जाणून घ्या रोचक गोष्ट-
 
असे म्हणतात की दक्षिण भारताचे प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत देखील महावतार बाबा यांचे भक्त आहे आणि त्यांच्यावर एक डॉक्युमेंट्री चित्रपट देखील तयार केले गेले आहे. रजनीकांत यांनी लिहिलेली 2002 ची तमिळ मूव्ही 'बाबा' बाबाजी वर आधारित होती.
 
आधुनिक काळात सर्वात आधी लाहिड़ी महाशय यांनी महावतार बाबा यांची भेट घेतली होती नंतर त्यांचे शिष्य युत्तेश्वर गिरी यांनी 1894 मध्ये अलाहाबाद येथील कुंभ मेळ्यात येथे त्यांची भेट घेतली होती. युत्तेश्वर गिरी यांची पुस्तक 'द होली साइंस' यात देखील त्यांचे वर्णन सापडतं. त्यांना 1861 ते 1935 दरम्यान अनेक लोकांनी बघितल्याचे पुरावे आहेत. ज्यांनी त्यांना बघितले त्यांचे वय 25 ते 30 असल्याचे सांगितले.
 
लाहिड़ी महाशय यांचे शिष्य स्वामी युत्तेश्वर गिरी होते आणि त्यांचे शिष्य परमहंस योगानंद यांनी आपल्या पुस्तक 'ऑटोबायोग्राफी ऑफ योगी' यात महावतार बाबा यांचा उल्लेख केला आहे. म्हणतात की 1861 आणि 1935 दरम्यान महावतार बाबा यांनी अनेक संतांची भेट घेतली होती. महावतार बाबा यांनी आदिशंकराचार्य यांना क्रियायोगाची शिक्षा दिली होती आणि नंतर संत कबीर यांना देखील दीक्षा दिली होती. नंतर प्रसिद्ध संत लाहिड़ी महाशय यांना त्यांचे शिष्य असल्याचे सांगितले जाते.
 
योगानंद जेव्हा त्यांना भेटले होते तेव्हा ते मात्र 19 वर्षाचे दिसत होते. योगानंद यांनी एका चित्रकाराच्या मदतीने महावतार बाबा यांचे चित्र काढले होते, तेच चित्र सर्वीकडे प्रचलित आहे. परमहंस योगानंद यांना बाबांनी 25 जुलै 1920 मध्ये दर्शन दिले होते म्हणून ही तिथी दरवर्षी बाबांजी यांचा स्मृतिदिन म्हणून साजरी केली जाते.
 
वर्तमानात पुण्याचे गुरुनाथ देखील महावतार बाबाजी यांना भेटून चुकले आहे. त्यांनी बाबाजी वर एक पुस्तक देखील लिहिली आहे- 'द लाइटिंग स्टैंडिंग स्टील'. दक्षिण भारताचे श्री एम. देखील महावतार बाबाजी यांना अनेकदा भेटून चुकले आहे. 1954 साली बद्रीनाथ स्‍थित आपल्या आश्रमात 6 महिन्याच्या काळात बाबाजी यांनी आपल्या एका महान भक्त एसएए रमैय्या यांना संपूर्ण 144 क्रियांची दीक्षा दिली होती.
 
लाहिड़ी महाशय यांनी देखील आपल्या डायरीत लिहिले आहे की महावतार बाबाजी भगवान कृष्ण होते. योगानंद देखील अनेकदा त्यांना जोराने 'बाबाजी कृष्ण' म्हणून प्रार्थना करत होते. परमहंस योगानंद यांच्या दोन शिष्यांची लिहिले आहे की महावतार बाबाजी पूर्व जीवनात श्री कृष्ण होते.
 
म्हणतात की महावतार बाबा यांची गुहा आज देखील उत्तराखंडच्या अल्मोड़ा जिल्ह्यात कुकुछीना येथून 13 किलोमीटर अंतरावर दूनागिरि येथे स्थित आहे. कुकुछीनाच्या जवळ पांडुखोली येथे स्थित महावतार बाबा यांची पवित्र गुहा सर्व संत आणि महापुरुषांची ध्यान स्थली होती. सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत आणि अभिनेत्री जूही चावला देखील बाबांच्या गुहेत दर्शनासाठी येत असतात. असे मानले गेले आहे की महावतार बाबाजी शिवालिकच्या या टेकड्यांमध्ये राहतात आणि अनेक योगींना त्यांनी येथेच दर्शन दिले. ते केवळ त्यांना दर्शन देतात ज्यांना योगाभ्यासात पुढे जायचे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाकंभरी नवरात्रौत्सव 2021, नऊ दिवस करा देवीची आराधना