Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 21 March 2025
webdunia

लव आणि कुश यांच्याबद्दल जाणून घ्या

लव आणि कुश यांच्याबद्दल जाणून घ्या
, शुक्रवार, 1 मे 2020 (12:05 IST)
भरताचे 2 मुले होती तार्क्ष्य आणि पुष्कर. लक्ष्मणाला चित्रांगद आणि चंद्रकेतु नावाची 2 मुले झाली. शत्रुघ्नला सुबाहू आणि भद्रसेन नावाचे 2 मुलं झाली. मथुरेचे नावआधी शूरसेन असे. लव आणि कुश श्रीराम आणि सीतेचे जुळी मुलं असे. जेव्हा श्रीरामाने भरताला राज्य भार देऊन वानप्रस्थ करण्याचा निर्णय घेतला तेव्हा भरत राज्याभिषेक करण्यासाठी तयार नव्हते. 
 
अशावेळी श्रीरामाने दक्षिण कौशल प्रदेश (छत्तिसगढ) मध्ये कुशला राज्यभर सांभाळण्याचे सांगितले आणि उत्तर कौशल मध्ये लवला राज्य सांभाळायला सांगितले आणि त्यांचे राज्याभिषेक केले. 
 
श्रीरामाच्या काळात देखील कौशल राज्य उत्तर कौशल आणि दक्षिण कौशल मध्ये विभागले होते. श्रीरामाने लवला शरावती (श्रावस्ती)चे राज्य दिले. लवचे राज्य उत्तर भारतात होते आणि कुशचे राज्य दक्षिण भारतात असे. कुश कुशावती हे राज्य असे, जे आजच्या काळाचे बिलासपूर जिल्ह्यात असे. कौशल्या ही रामाची आई कौशल्याचे जन्मस्थळ असे. कुशला अयोध्येला जाण्यासाठी विध्याचंल नदीला ओलांडून जावे लागत असे. या वरून हे प्रमाणित होते की त्यांचे राज्य दक्षिण कौशल मध्येच असे.
 
राजा लव यांच्यापासून राघव रजपुतांचा जन्म झाला. ज्याने बडगुजर, जयास आणि सिकरवार वंश झाले. ह्यामधील दुसरी शाखा म्हणजे सिसोदिया रजपूत वंशाची असे. ज्यात बैसला आणि गहलोत वंशाचे राजा राजा कुशपासून कुशवाह (कछवाह) रजपुताचे वंश उत्पन्न झाले.
 
ऐतिहासिक तथ्यांप्रमाणे राजा लव यांनी लवपुरी नावाचे नगर स्थापिले. आजच्या काळात ते पाकिस्तानच्या लाहोर शहरात असे. येथे राजा लवचे देऊळ सुद्धा बांधण्यात आले असे. काळांतरात लवपुरीचे अपभ्रंश लोहपुरी झाले. दक्षिण पूर्व आशियाई देश लाओस, थाईचे शहर लोबपुरी हे दोन्ही स्थळ त्यांचाच नावावर असे. 
 
श्रीरामाच्या दोन्ही मुलांमधून कुशचे वंश पुढे वाढले. कुशहून अतिथी, अतिथीपासून निषधन, मग नभ, पुंडरिक, क्षेमन्धवा, देवानीक, अहिनक, रुरु, पारियात्र, दल, छळ, उक्थ, वज्रनाभ, गण, व्युशिताश्व, विश्व्सह, हिरण्याभ, पुष्य, ध्रुवसंधी, सुदर्शन, अग्निवर्ण, पद्मावर्ण, शिग्रह, मारू, प्रयुश्रुत, उदावसू, नंदीवर्धन, साकेतू, देवरात, बृहदक्थ, महावीर्य, सुधृती, दृष्ठकेतू, हर्य्व, मारू, प्रतींधक, कुतीर्थ, देवमीढ, विबुध, महाधृती, कीर्तिरात, महारोमा, स्वर्णरोम, हृस्वरोम पासून सीरध्वज जन्मले आहे.
 
कुश वंशाचे राजा सीरध्वज यांना सीता नावाची एक कन्यारत्न प्राप्त झाली. सूर्यवंशाचा विस्तार झाला ज्यात कृति नावाच्या राजाच्या जनक नावाचा मुलगा झाला. यांनी  योगमार्ग पत्करला. कुश वंशापासूनच कुशवाह, मौर्य, सैनी आणि शाक्य सम्प्रदाय स्थापित झाले आहे. 
 
एका संशोधनानुसार लव आणि कुश यांच्या 50 व्या पिढी मध्ये शल्य झाले. शल्य महाभारतामध्ये कौरवांकडून पांडवांशी लढले होते. महाभारताच्या 2500 वर्ष ते 3000 वर्ष पूर्वी लव आणि कुश होते. शल्य यांचा पश्चात बहतक्षय, उरुक्षय, बात्सद्रोह, प्रतिव्योम, दिवाकर, सहदेव, ध्रुवश्च, भानुरथ, प्रतिताश्व, सुप्रतीप, मरुदेव, सुनक्षत्र, किन्नराश्रव, अंतरिक्ष, सुषेण, सुमित्र, बृहद्रज, धर्म, कृतज्ज्य, व्रत, रणज्जय, संजय, शाक्य, शुद्धोधन, सिद्धार्थ, राहुल, प्रसेनजित, क्षुद्रक, कुलक, सुरथ, सुमित्र झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उत्तर रामायण : सामर्थ्यवान लवणासुराच्या काही निवडक गोष्टी जाणून घेऊ या..