Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रुद्राक्ष आणि तुळशीची माळ घालण्याचे फायदे

रुद्राक्ष आणि तुळशीची माळ घालण्याचे फायदे
, मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (00:43 IST)
वैज्ञानिक मान्यता – रुद्राक्ष, तुळशी सारख्या दिव्य औषधांची माळ धारण करण्या मागे वैज्ञानिक मान्यता अशी आहे की ओठ आणि जिभेचा वापर करून मंत्र जप केल्याने गळ्याच्या धमन्यांना सामान्यापेक्षा जास्त काम करावे लागतात. यामुळे कंठमाला, गलगंड इत्यादी रोग होण्याची शक्यता असते . यांच्यापासून बचाव करण्यासाठी गळ्यात रुद्राक्ष व तुळशीची माळ घातली जाते.  
 
शिवपुराणात म्हटले आहे -
यथा च दृश्यते लोके रुद्राक्ष: फलद: शुभ:।
न तथा दृश्यन्ते अन्या च मालिका परमेश्वरि।।
 
जगात रुद्राक्षाच्या माळा सारखी दुसरी कुठलीही माळ फळ देणारी व शुभ नसते.  
 
श्रीमद् देवी भागवतात लिहिले आहे -
रुद्राक्ष धारणच्च श्रेष्ठ न किचदपि विद्यते।
 
जगात रुद्राक्ष धारण करण्यापेक्षा दुसरी कोणती गोष्ट नाही. रुद्राक्षाची माळ श्रद्धाने धारण करणार्‍या मनुष्याची आध्यात्मिक प्रगती होते. सांसारिक बाधा आणि दुःखापासून सुटकारा मिळतो. मेंदू आणि हृदयाला शक्ती मिळते. ब्लडप्रेशर नियंत्रित राहत. भूत-प्रेत इत्यादी बाधा दूर होण्यास मदत मिळते. मानसिक शांती मिळते. गर्मी आणि थंडीच्या रोगांपासून मुक्ती मिळते.  
 
तुळशीचा हिंदू संस्कृतीत फार धार्मिक महत्त्व आहे. यात विद्युत शक्ती असते. ही माळ धारण करणार्‍यांमध्ये आकर्षण आणि वशीकरण शक्ती येते. त्यांच्या यश, कीर्ती आणि सौभाग्यात वाढ होते. तुळशीची माळा धारण केल्याने ताप, सर्दी, डोकदुखी, त्वचा रोगांपासून फायदा मिळतो. संक्रामक आजार आणि अवेळी मृत्यू येत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे. शालग्राम पुराणात म्हटले आहे की तुळशीची माळ जेवण करताना शरीरावर असल्याने अनेक यज्ञांचे पुण्य मिळतात. जे कोणी तुळशीची माळ धारण करून अंघोळ करत, त्याला सर्व नद्यांमध्ये अंघोळ करण्याचे पुण्य मिळतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संकष्टी चतुर्थी: या सोप्या उपायांनी मिळेल गणपतीचा आशीर्वाद